STORYMIRROR

Smita Doshi

Others

4  

Smita Doshi

Others

कुटुंब जोड काळ

कुटुंब जोड काळ

1 min
258

कुटुंब... ज्याचं आज विघटन होत चाललंय...

आज कुटुंबासाठी कुणाकडे वेळ आहे

वडील नोकरीला, आई जॉबला

मग मुलं?

मुलं मग पाळणाघरात...


कशी घालायची आता याची सांगड?

कसे टिकेल अशानं कुटुंब?

एक समस्याच आहे मोठी

मोठ्यांसाठी आज वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे

पाळणाघरांचीही आज चलती आहे

आपली मुलं दुसऱ्याकडे मोठी होत आहेत

पालकांपासून दुरावत चालली आहेत

पण कुणाला याची फिकीर आहे?


लहान कुटुंब...घरात कुणी मोठे नाही

जबाबदारीची जाणीव नाही

मुलं आणि पालक, कसा सांधावा हा दुवा?

प्रेमातही आली आहे आज व्यवहारिकता

तरुण मुलं मित्र आणि मोबाईलमध्ये दंग

त्यांचे पालक पार्ट्यांमध्ये गुंग


कुणाचा कुणाला मेळ नाही

कुणाचा कुणाला धरबंध नाही

कशी निपजणार हो ही नवी पिढी

तिच्यापुढे कसला ठेवणार आदर्श?


तुम्हीच जाणूनबुजून झालात असमंजस 

तर मुलं कशी होणार समंजस

काळजी वाटते, कीव करावीशी वाटते

हा, याला मला वाटते एकच आहे उत्तर, 'काळ'


काळ करेल सर्वांना दुरुस्त

ठेवा यावर विश्वास तुम्ही बिनधास्त।



Rate this content
Log in