कुठेतरी बाहेर जायचय मला
कुठेतरी बाहेर जायचय मला
1 min
133
घरात बसून,अभ्यास करून
कंटाळा आलाय मला
कुठेतरी बाहेर जायचय मला
डोंगर चढून जाऊया वर
जंगलामध्येच बांधूया घर
सगळं कसं छान सुंदर
निसर्गाचं रूप भरभरून पहायचंय मला
कुठेतरी बाहेर जायचय मला
समुद्र किनारा मज खुणावतो
लाटांचा तिथे खेळ चालतो
सूर्यास्त अप्रतिम भासतो
वाळूत खेळायचे आहे मला
कुठेतरी बाहेर जायचय मला
