कुठे शोधीशी
कुठे शोधीशी
1 min
258
काय माहीत आहे कुठे
त्याला मी शोधू कुठे।
कधी पावला का कोणाला?
नाही दाद देत भजनाला।।
कुठलं कुलूप कुठल्या भिंती
समोर याच्या गल्ला चोरती।
लोक करिती समोर चाळे
याचे दोन्ही डोळे आंधळे।।
म्हणे पावतो नवसाला
बोकडाचा नैवेद्य द्या याला।
तो काय बोकड खातो
तुम्ही आम्ही ताव मारतो।।
देव न कधी दूध पितो
फुलांचा न कधी वास घेतो ।
त्याला न कसला अहंकार
तो असतो निर्गुण निराकार।।
अरे, देव वसे हृदयात
तो न दिसे पाषाणात।।
सेवा दिनदुबळ्यांची करी
पूजा हीच असते खरी।।
