STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

कुपी

कुपी

1 min
326

अत्तराच्या कुपीगत

सहवास सुगंधित

स्मृती सोनेरी आजही

मनोमनी उल्हसित


प्राजक्ताच्या ओंजळीत

रंग गंध नि उल्हास

झेप घेतसे मन्मन

श्वेत फुलांसाठी खास


अभ्यासाच्या गर्दीमधे

सडा नुसता फुलांचा

कोणी देईना घेईना

गंध दरवळायचा


देश सोडलास तरी

स्मृती जपल्या सुगंधी

पत्र सुगंधी अत्तर

गंध अनोखा आनंदी


काळ गेला उलटून

तरी अत्तर प्रेमाचे

जपे मनाच्या कुपीत

आता बंधन नात्याचे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन