कुणाला वाटतं का ?
कुणाला वाटतं का ?
कुणाला वाटतं का हो
कुठली ही नाती दूर व्हावं ?
पण प्रश्न असा उद्भभवतो
नेमक कोण पुढाकार घ्यावं......
प्रत्येकाला वाटतं की
समोरच्याची चूक आहे
फक्त माफी या एका शब्दामुळे
कित्येक नाती अडून आहे.....
जे पूर्वी गेले ते घडून काही
त्याला खेचण्यात अर्थ नाही
जी नाती जपण्यासाठी जन्म घेतला
त्यांच्याविना जन्म सार्थ नाही......
सण वार असे किती पर्व येतात
परत सामंजस्याने एक होण्याचे
का गमावतो खोट्या गर्वापायी
दिन हॆ आल्हाददायक सोन्याचे........
वरून कितीही दाखवले
तरी कुणाचेही मन नसते प्रसन्न
स्वतःलाच माहित असते
-हदय आतून होतोय किती खिन्न.....
प्रत्येकालाच वाटतं असतं
असं नको व्हायला हवं होतं
पश्चात्तापेच्या आगीत जळण्यापेक्षा
परत जिव्हाळ्याने जपाव नातं......
नवीन वर्षाचा हा सुंदर क्षण
जाऊ देऊ नका वाया
विसरा सारे क्लेश मनातील
दाखवा प्रेम, आपुलकी व माया.......
