STORYMIRROR

Vishweshwar Kabade

Others

3  

Vishweshwar Kabade

Others

कुणाकडं?

कुणाकडं?

1 min
222

कुंपणानेच शेत खाल्लं तर दाद न्यावी कुणाकडं? कुणाकडं?

आपलेच दात, आपलेच ओठ, तक्रार करावी कुणाकडं? कुणाकडं?

आपलीच जीभ, आपलेच दात, सांगावं कुणाकडं? कुणाकडं?

घर का भेदी, लंका ढान, बोलावं कुणाकडं? कुणाकडं?

आपलाच खुपसतो पाठीत खंजीर, जावं कुणाकडं? कुणाकडं?

पैसा झाला प्यारा, भाऊ झाला वैरी

धीर देतोय गैरी

नवल बघते दुनिया सारी

भ्रमित झाली मती

विसरली नाती-गोती

फक्त वाढली संपत्तीची पोती

नाही राहिला एकमेकांप्रति स्नेेेह 

काय उपयोग ठेऊनी शाबूत हा मानवी देह

जिकडेेे तिकडे फक्त नी फक्त आहे दाह

जीव झाला येथे अर्धा

पण आपल्यातच लागली अहंकाराची स्पर्धा

आपलेच द्यायलेत एकमेकांवर घाव

साधायलेेत आपला डाव

कमी करायलेत प्रेमाचा भाव, बघावं कुणाकडं? कुणाकडं?

आपलेच झालेत गद्दार

करायलेत आपल्यावरच वार, पहावं कुणाकडं? कुणाकडं?

आपलेच करायलेत आपल्यालाच निराधार

माघावं आधार कुणाकडं? कुणाकडं?


Rate this content
Log in