STORYMIRROR

Sushama Gangulwar

Others

2  

Sushama Gangulwar

Others

कुंकू

कुंकू

1 min
382

रोज रोज कुंकू लावते

मी तुमच्या नावाचं

अस्सल माती सोडून आले

मी तुमच्यासाठी माझ्या गावाचं


शहरात आले भितभित

मी अडाणी तुमच्या पाठी

ह्यो रस्ते आणि बिल्डिंगा

ध्यानात ठेवण्यासाठी किती

मारु मी पदराला माझ्या गाठी


असला नट्टापट्टा धनी बघा

मला नाही जमत

चारचौघी दारात जमवून

गुलूगुलू बोलल्याखेरीज

मला नाही गंमत


तुम्ही जाताना ऑफिसात 

दार लावून जाता

किती जोर लावते

तरी मला कडी नाही निघत


एकटी घरात बसून

त्या टीव्हीतली भावल्या

बघून किती मी हसू

असे रोज रोज झाले ना

एक दिवस मीच तुम्हाला 

कार्टून गत दिसू


तुम्ही गेल्यावर मी 

घरात एकटीच पडते

माझ्या मातीची मला 

लई आठवण येते

एका कोपऱ्यात बसते

आणि मनसोक्त रडते

खरं सांगते धनी तुम्हाला 

माझे मन इथे नाही हो रमते


Rate this content
Log in