कुंडली
कुंडली
दोष नाही कोणाचा, दोष आहे वेळेचा.
निष्पाप जीवांनी जन्म घेतला, कलंक लागला आयुष्याचा.
ज्याने त्याने लावला तर्क, मांडला आपला आभ्यास.
कागदाच्या तुकड्यावर अनं जन्माच्या वेळेवर, घेतो का आपन श्वास.
तरीही भिती आहे, काय होईल भविष्य.
त्याच चिंतेच्या आहारी, ऐकली किती तरी भाष्य.
साता जन्माच्या गाठी, टिकतात फक्त विश्वासाने.
ज्यांच्या पत्रिका नाही पाहिल्या कधी, ते पण जगतात एक मताने.
दोष असून भाग्यात काहीही, केला संसार सूरळीत.
फुला सारखाच सुगंध, दोन जिवांच्या कळीत.
जन्मा सोबत जात मिळते, कुंडली असते पाठीला.
योग्य समजूतदार जोडीदार मिळाला, कश्याला गरज या तर्काच्या साथीला.
जन्मतःच त्याच्या, त्या ठिकाणी जमली होती मंडळी.
त्यांना नव्हतं माहीत, आयुष्याला चिकटली होती कुंडली.
