कुछ मिठा हो जाये ..मकरसंक्रांत
कुछ मिठा हो जाये ..मकरसंक्रांत
आली थंडी सुगीचे दिवस
मकरसंक्रांत नव्या वर्षाचा पहीला सण
नवे अन्नधान्य, भरायचे सुगड
अंगावर ल्यायची काळी चंद्रकळा लुगडं
नव्य नवरीची नवी नवलाई
लाजत मुरकत उखाणा ओठावर ग बाई
लुटायचे सौभाग्याचे हळद कुंकु
बांगड्या जोडवी मंगळसूत्राचे वाण
घोंगावणाऱ्या वारा, पतंग उंच हवेत
ढगाने जणू सामावून घेतलं कवेत
गोडवा तो तिळगुळाचा, नात्यांमधे ठेऊ
एकमेकांच्या घरी जाउन तिळगूळ देऊ घेऊ
नको रुसवा, नको हेवेदावे, नको लढाई
गोडवा वाढवणारा हा सण मारा बढाई ॥
