कठीण कठीण
कठीण कठीण
1 min
230
कठीण कठीण कठीण किती
पुरुष हृदय बाssई
स्त्रीजाती प्रति झटता
अंत कळत नाssही
कठीण कठीण कठीण किती
हृदयाचा सुंदरसा गोफ गुंफिती
पदर पदर परि शेवटी
तुटत तुटत जाssई
कठीण कठीण कठीण किती
रंगूनी रंगात मधुर
मधुर बोलती
हसत हसत परि शेवटी
निर्बंध तोडितीss
कठीण कठीण कठीण किती
