कथेतील परी
कथेतील परी
1 min
421
मनाला माझ्या मोहविते नाजूक ही परी
घायाळ करते तिच्या गालावरची खळी
विहार हिचा कापसासम शुभ्र ढगांवरी
झोका घेती चंदामामाच्या झुल्यावरी
नभ हिचा मित्र तारका ह्या मैत्रिणी
निशा ही तीची खास सखी जाहली
चमचमता फ्रॉक आणि काचेचे बूट ल्याली
पंख सुंदर लेऊनी जादूची कांडी फिरवली
पांढऱ्या लख्ख रथेवरती स्वार होऊनी
स्वतःच भाळते स्वतःच्या साजऱ्या रूपावरी
इंद्रधनुष्याचे सारे रंग भूतलावर पसरवती
अन् अशा प्रकारे परी ही कथांमधे मिरवती
