STORYMIRROR

Bharati Sawant

Others

4  

Bharati Sawant

Others

कस्तुरी गंध

कस्तुरी गंध

1 min
162

नक्षत्रवेलीवरच्या कळ्यांचे 

फुलवले काशीसरांनी फूल 

पडते ललितलेखनाची इथे

समस्त सारस्वतांनाच भूल 


उगवत्या काव्यलतिकांची

बरसतेय लेखणीच झरझर 

विषय लेखनाचा रोमँटिक 

उतरतो कागदावरी सरसर 


नसते ठावूक कस्तुरीमृगास

येतोय कुठून हा कस्तुरीगंध

सारस्वतांच्या लेखणीचाच 

पसरलाय सर्वदूरवरी सुगंध 


कौतुकाचे बोल लालित्याचे

श्रीकांतसर भारतीही तत्पर 

नाही उण्यावाट्याचे कोणी

भागीदार या नक्षत्र वेलीवर


अलवार गंधित पुष्पसुमांची

होई वेलीवरती सुरेख गुंफण 

पसरे कस्तुरीगंधाचा दरवळ 

नसे शब्दकंटकांचेही कुंपण


बहरल्यात काव्यसम्राज्ञीही

आत्मविश्वासानेच वेलीवर 

लेखणीची मनोहारी जादू 

आहे मखमाली वसुंधरेवर 


Rate this content
Log in