STORYMIRROR

Medha Desai

Others

4  

Medha Desai

Others

कष्टाविण फळ ना मिळते

कष्टाविण फळ ना मिळते

1 min
3.7K

माणसाच्या संघर्षमय जीवनात

कष्टाला, श्रमाला फार महत्त्व आहे

उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला

पै पै कमावण्याची नितांत गरज आहे १


आराम हराम आहे म्हणतात

तसेच कष्टावीण फळ ना मिळते

जगण्याच्या वेगवेगळ्या वाटा असतात

त्यातूनच माणसाला जीवनाचे मोल कळते २


शेतकरी शेतात राबराब राबतो

त्याच्या श्रमाने लोकांचे पोट भरते

तो तर संपूर्ण जगाचा पोशिंदाच आहे

जगण्यासाठी सर्वांना कष्ट करत रहावे लागते ३


माणसाला गरीबीतून वर आल्यावर

खरे श्रमाचे, कष्टाचे महत्त्व कळते

आणि मग स्वतः कमवत राहिल्यावर

काटकसरीने रहायचे कसे ते कळते ४


कारखान्यातील कामगारांचे श्रम

औद्योगिक उत्पादन वाढवतात

इमारत बांधणाऱ्या गवंड्यांचे श्रम

मोठमोठी सुंदर घरे, इमारती उभारतात ५


घर बांधण्यासाठी लागणारा पैसा

कुटुंबवत्सल माणसाच्या श्रमातूनच येतो

स्वप्नपूर्तीच्या आनंदाचा हा ठेवा 

माणसाला सुखसमृद्धीकडे नेतो ६


श्रम हा माणसाच्या जीवनाचा

एक अविभाज्य घटकच असतो

तेव्हा सुखशांतीच्या वाटेकडे जाताना

तिमिरातून तेजोमय मार्ग दिसतो ७


तंत्रज्ञानाची, शिक्षणाची नेहमी कास धरावी

तरीही माणसाचे कष्टसाध्य जीवन असते

त्याशिवाय जीवनात खरी दिशा नसावी

तेव्हाच माणसाला सारे चैतन्यमय दिसते ८


Rate this content
Log in