STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Children Stories Others Children

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Children Stories Others Children

कष्टाची भाकर

कष्टाची भाकर

1 min
217

देवाने दिले आहेत दोन हात

त्याने काही तरी काम करावे

देवाने दिले आहेत दोन पाय

त्याला कामासाठी फिरवावे


हात पसरून भीक मागणे

तुझ्या हाताचे हे काम नाही

चबूतऱ्यावर बसून राहणे

तुझ्या पायाला शोभत नाही


जीवन आहे खूप अनमोल

त्याला असे व्यर्थ करू नको

हात-पाय हलवून कष्ट कर

स्वाभिमान असा घालवू नको


परिश्रमातून मिळतो आनंद

गोड लागे मग कष्टाची भाकर

चार पैसे कमवायला शिक

भीक मागून बनू नको लाचार


Rate this content
Log in