क्षत्रपती शिवाजी
क्षत्रपती शिवाजी
माझा राजा आज नसेल
फक्त इथे उरली त्याची मूर्ती आहे
सातासमुद्रापार पोहोचली ती
शिवक्षत्रपतींचीच किर्ती आहे...
राजे तुमचे स्थान आमच्या हृदयात
सर्वात वरती आहे...
कोणी सामान्य माणूस नाही
ज्याने दिल्लीचे तख्त पण
हादरवून दिले अशा सिंहाची
ही मूर्ती आहे...
पारतंत्र्याचे काळे ढग
सर्विकडे जेव्हा दाटले होते...
अन्याय जुलमाने भारतमातेचे
काळीज जेव्हा फाटले होते...
धाडावे एका युगंधराला
धरतीवरती असे सर्वज्ञानी
परमेश्वराला जणू वाटले होते...
जेव्हा पर्वत सह्याद्री शिवबाच्या
जन्मासाठी हे साजश्रुंगारानी नटले होते...
ज्याने पुण्यात लालमहला
शाहिस्तेखानाची बोटे तोडले
दगाफटका झाला तरीही वाघनखांनी
अफझलखानाचे पोट ज्याने फाडले
बलात्काराल्या शिक्षा म्हणून
हत्तीच्या पायी ज्याने धाडले
तो जिजाऊंचा बाळ होता
पुऱ्या यवनी सैन्याला पुरुन
उरणारा कर्दनकाळ होता...
तुमचाच पुत्र संभाजी प्राणास मुकला
पण शत्रुसमोरी कधीही तो न झुकला
जेव्हा औरंगजेबाच्या कैदेत तो
धारातीर्थी पडला होता
तेव्हा त्याचा मृत्यु पाहून तर
अख्खा महाराष्ट्र रडला होता...
मावळ्यांच्या पराक्रमाने पावन
झाली ही महाराष्ट्राची धरती...
इतिहासाची साक्ष देत उभा आहे स्वाभिमानाने
फडकणारा भगवा झेंडा रायगडावरती...
