* क्षणभंगुर*
* क्षणभंगुर*


*क्षणभंगुर*
जीवन आहे आपले क्षणभंगुर
जीवन सर्वांनी भरभरून जगावे
नको रुसवे फुगवे कोणाबरोबर
सर्वांना आपण आपलेच मानावे...
जीवनातील सारेच क्षण आपण
घड्याळासमावेत जगत असतो
वेळेच्या साम्राज्यात सारेचजण
सुखदुःखाचे क्षण मात्र वेचतो...
जीवन आहे हा अथांग सागर
यात पोहायला जमणार नाही
पण बहरत जाईल फुलासारखे
इथे उणे धुणे मात्र नको काही...
बघतो स्वप्ने विश्वासाने आपण
बघता बघता खेळ इथे रंगतो
स्वप्नांचे इमले चढवता चढवता
जीव मात्र मेटाकोटीस येतो....
समाजाचे मूल्य सारेच जाणूया
जीवनी माणुसकीनेच वागूया
नातेसंबंधांची जपणूक करूया
मैत्रीचे नाते जुळवत राहूया...
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी,जिल्हा - पुणे*
*