STORYMIRROR

Dinesh Kamble

Others

4  

Dinesh Kamble

Others

क्षण

क्षण

1 min
297

बोलूया गोडीने

घाई नको सवडीने

बसूया जोडीने 

बागेमधी 


घडीभर विश्रांती

घेतली ना आजवर

सोबतीला जन्मभर 

असूनही


नेटाने ओढला

संसाराचा हा गाडा

उभारीला वाडा

टोलेजंग 


गालातल्या गालात

जेव्हा जेव्हा हसायची

हिरोनीवानी दिसायची

कधीकाळी


सोबतीने वेचिले 

क्षण सारे सुखाचे 

नव्हते दुःखाचे 

रडगाणे


Rate this content
Log in