क्षण सुखाचे
क्षण सुखाचे
1 min
317
सुखाचे क्षण
येतात घरी
स्वागत करू
आपल्या दारी.....
सजे अंगण
फुला फुलांनी
सडा रांगोळी
पर्ण रेघांनी...
फुलले मनी
हर्ष नांदतो
कुपीत ठेवा
मोद साठतो...
सजणा सवे
सजनी सुखी
सजना नसे
सजनी दुःखी
काव्य करते
धन्य मानते
क्षण सुखाचे
ओटी सजते....
बाबांना मोद
हर्ष आईला
पती आनंदे
पाहूनी मला....
क्षण सुखाचे
ओटीत माझ्या
घातलेस तू
प्रीतीने तुझ्या....
