क्षण सुखाचा...
क्षण सुखाचा...
हा क्षण सुखाचा सावरू दे माझ्या मना ,
ओंजळीतून निसटतांना गारवा दे माझ्या मना ...
प्रतिबिंब मनावर कोरता भास श्वास हा ,
तुज पाहता मी स्वप्नात भासू दे माझ्या मना ...
छळीतो गंध मोगऱ्याचा लाजली जाईजुई,
अत्तर तुझ्या सहवासाचे शिंपडू दे माझ्या मना...
माझ्या मनाच्या आभाळात समावलेला चंद्र तू ,
तुज पाहता लाजून हसू दे माझ्या मना ...
थांब ना इथे जरासा गुपित सांगते तुला,
स्पर्श प्रेमाचा होता सुखावू दे माझ्या मना...
दिलासां तुझा वाऱ्यासंगे वाहून येता ,
रोमरोमी पुलकित बासरी वाजवू दे माझ्या मना
हा क्षण सुखाचा सावरू दे माझ्या मना ,
ओंजळीतून निसटतांना गारवा दे माझ्या मना ...
