STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

3  

Sarika Jinturkar

Others

क्षण काही...

क्षण काही...

1 min
141

क्षण काही हवेहवेसे

हृदयाच्या कप्प्यात अलगद जपलेले  

माणिक मोती क्षणांचे सुरक्षित त्यात लपलेले  


क्षण हळवे, क्षण बावरे क्षण आठवणींचे  

क्षण काही आनंदाचे, काही निराशेचे 


क्षण काही प्रेमाचे, मायेचे 

कधी असतात तिरस्कार परकेपणाचे 


क्षण काही असतात खचलेल्या मनाला प्रेरणा देणारे

तर काही अस्तित्वाची जाणीव करून देणारे 

क्षण हे काहीसे भविष्याचे रंगीत स्वप्न दाखवणारे 

वाटतात काही हवेहवेसे

क्षण कधी हसऱ्या शब्दांचे तर कधी बोचऱ्या भावनांचे  

समजून उमजून साऱ्यांना असते फुलापरी जपायचे


क्षणात सुरू होत काहीही आणि 

काही क्षणात थांबत 

क्षणांचा खेळ हा सारा 

 आयुष्य हे क्षणभंगुर 

म्हणून प्रत्येक 

क्षण जगावा बेभान, बेधुंद लाटांसारखा 

गगन भरारी घेणाऱ्या पक्षांसारखा आणि संपूर्ण सृष्टीला पांघरूण घालणाऱ्या अवकाशासारखा  

 क्षणाक्षणांनी बनत आयुष्य हाच मार्ग असतो

 जीवनाच्या प्रवासाचा...



Rate this content
Log in