क्षण ©®: नीलिमा देशपांडे
क्षण ©®: नीलिमा देशपांडे
1 min
272
क्षणांचीच ही सारी किमया,
कल्पित जेथे नसते काही....
क्षणात असते फूल हासरे,
क्षणात ते कोमेजून जाई ....
वर्तुळ असता मस्त भोवती,
क्षणात कधीतरी त्रिज्या बदले...
क्षणिक असतो यश शिखरावर,
क्षणभंगूर जग अनेक वदले....
क्षणासाठी ही दुःखेे येती,
क्षणात येती सुखेही सारी ....
क्षणभर येते मनी ही शंका,
कशासाठी ही वणवण सारी?
कशासाठी ही वणवण सारी?....
