क्षमता
क्षमता
1 min
372
ज्याच्या अंगी क्षमता जेवढी
करतो तो तेवढचे कार्य,
झेलून घाव, सोसतो झळा
दाखवतो आपले औदार्य
क्षमतेचे स्वरुप प्रत्येकाच्या
परस्परांहून असते वेगळे,
प्रयत्नांची घालून सांगड
झटताना दिसतात सगळे
असो सजीव वा निर्जीव
करतच असतो संघर्ष,
आयुष्याच्या वाटेवरती
पेलतो सुख दु:ख वर्षानुवर्ष
स्वबळाच्या जोरावर एक
जीवनाला मिळते दिशा,
कधी शक्ती, कधी युक्ती
लावून करतो पूर्ण आशा
कुणी जाणतो स्व क्षमतेला
कुणी तिच्यापासून अजाण,
करत रहावे सत्कर्म तोवर
असेल जोवर या देहात प्राण
हरएक ठिकाणी असते
क्षमतेला खूपच महत्व,
तिच्यावरच ठरले जाते
जगातील आपले अस्तित्व
