STORYMIRROR

Jayshree Hatagale

Others

2  

Jayshree Hatagale

Others

क्षितिजावरती......

क्षितिजावरती......

1 min
592

क्षितीजावरती ऊन कोवळे

कधी दाटूनी येती घन सावळे

हिरवागार हा निसर्ग सारा

रोज मखमली नवे सोहळे


क्षितिजावरती इंद्रधनूने

सप्तरंगांची केली उधळण

इथेच होते अंबर-धरेचे

युगे-युगे हे मधुर मिलन


क्षितिजावरती फुलवून पिसारा

नाचत रहातो मोर मनाचा

प्राशून घ्यावा निसर्गातला

मकरंद मधुर, क्षणा-क्षणाचा


क्षितिजावरती सांज ही ढळता

उतरते धरेवर जणू चांदणे

उजळून निघावे आयुष्य अवघे

इवलेसे हे असे मागणे


क्षितिजावरती मन विसावे

सुकून जीवाला इथेच मिळतो

जगणे-मरणे निसर्ग नियम हा

अर्थ आयुष्याचा इथेच कळतो


Rate this content
Log in