STORYMIRROR

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

कशात काय

कशात काय

1 min
427

कशात काय आणि फटक्यात पाय

वासरात शहाणी ठरे लंगडी गाय।

आहोत एकाच आईची लेकरं सारी

नका कुणी अडकवू पायात पाय।।१।।


गरज सरो अन् वैद्य मरो ही रीत

असतील शीतं तर जमतील भुतं।

गोतास काळ होई कुऱ्हाडीचा दांडा

सदाच जगामध्ये कुंपण शेत खातं।।२।।


मातीच्याच चुली असतात घरोघरी

आपलीच मोरी नि मुतायची चोरी।

रात्र थोडी अन सोंगे फार होता

ताटाखालचं मांजर करी शिरजोरी।।३।।


आवळा देऊन कोहळा काढावा

डोंगर पोखरून उंदीर पकडावा।

काखेत कळसा गावाला वळसा

चोराला सोडून संन्यासी धरावा।।४।।


धन्याला धत्तूरा, चोराला मलिदा

जावयाचं पोर लईच हरामखोर।

आठ हात लाकूड नऊ हात धीलपी

दानपेटीसाठी होती चोरावर मोर।।५।।


Rate this content
Log in