कशासाठी पोटासाठी
कशासाठी पोटासाठी
1 min
141
झुंज सदा जगण्यात
जातो दिवस कष्टात
घास सुखाचा एकदा
आस वेगळि मनात
रोज करावा सामना
उभ्या समस्या रांगेत
नाही पर्याय भुकेला
जरी गरिबी दैवात
कष्ट किती जिवनाला
घास सुखाचा जिवाला
मोह सुखाचा सुखाचा
कसा दिन आशावला
काय उत्तर प्रश्नांचे
तगमग कसासाठी
रोज झुंज जगण्यात
कष्ट नवं पोटासाठी