करूया जागर
करूया जागर
घुमू दे घागर, घागर, खड्यांची गिरिजा माई, करूया जागर, जागर, माहेरी आली आई||
माहेरवाशीणीचा थाट, हाती आरतीचे ताट,फुले पेरलेली वाट,घेई कडेवर,
कडेवर, गणू बाळा गौराई,करूया जागर, जागर, माहेरी आली आई||१||
सुहासिनीचा आज मान,झिम्मा, फुगडी खेळी छान, भजनाची चढते कशी तान,
पुरण पोळी गं, पोळी गं, खाई अंबा बाई, करूया जागर, जागर, माहेरी आली आई||२|
सूप नाचवूया, नाचवूया, 'पकपक', पकवा बोलूया, खोडी एकमेक काढू या,घट डोईवर,
डोईवर, भरलेली पुण्याई,कर
ूया जागर, जागर, माहेरी आली आई||३||
(उखाणा)
चमचम टिकल्या, उडाल्या, आभाळात जाऊन बसल्या,
टिमटिम चांदण्या जाहल्या, अन?..नाव घे ना सई!!.....
घेती लाजत उखाणे, नववधूंचे ते बहाणे, दिन अडीच रहाणे, रात उरली गं,
उरली गं, नको निजण्याची घाई,करूया जागर, जागर, माहेरी आली आई||४||
उद्या जाण्याची तयारी, तुझ्या जाशी तू सासरी, कधी येशी तू माघारी,
आठवण राही गं, राही गं, भरून डोळे येई, करूया जागर, जागर, माहेरी आली आई||५||