STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

कर्तव्यपालन

कर्तव्यपालन

1 min
239

कर्तव्याची दोरी / जयाचिये हाती

सत्कार्याची पूर्ती / करीतसे  


सांभाळी पालकां / प्रेमे वागविती

नको वृद्धाश्रमी / धाडणेचि


वनवासी जाती / राम आदर्शचि

जाण कर्तव्याचि / मनोमनी


भावना कर्तव्य / गुंता मनामधी

विवेके सोडवी / आचरणे


इतर भावंडे / कर्तव्य सोडती

तुलना नकोचि / मनामधे


आदेश पालन / संकट काळात

सर्व पाळतात / नियमचि


आरोग्य रक्षण / साथीच्या रोगात

बसावे घरात / सर्वांनीच


स्वच्छता पाळावी / संपर्क नसावा

रोग तो टाळावा / कोरोनाचा


गरीब श्रमिक / बसले उदास

अन्नदान त्यांसी / कर्तव्यचि


कर्तव्यपालकां / संधिकाल येता

येई कृतार्थता / सत्कर्माने


Rate this content
Log in