STORYMIRROR

Manisha Potdar

Others

4  

Manisha Potdar

Others

कर्तव्यदक्ष आई

कर्तव्यदक्ष आई

1 min
309

इतकी छाया देऊ नकोस आई ,

की मला ऊन सहन होणार नाही


इतकी माया करू नकोस आई ,

की मला राग सहन होणार नाही


इतकी सेवा पुरवू नकोस आई ,

की मला कष्ट सहन होणार नाही


इतका लाड करू नकोस आई ,

की मला हट्टाची सवय लागणार नाही


इतकी स्वार्थी बनु नकोस आई ,

की मला देशासाठी जगता येणार नाही


इतकीच जाणीव दे मला आई ,

की मी भ्रष्टाचार करायला धजणार नाही


इतकीच शिकवण दे मला आई ,

की मी मेहनत करायला लाजणार नाही


इतकीच हिम्मत दे मला आई ,

की मी संकटाना घाबरणार नाही


इतकीच कृपा कर माझ्यासाठी आई ,

की तुझा आशिर्वाद माझ्यावर असु दे आई


Rate this content
Log in