*कर्तव्याची दोरी*
*कर्तव्याची दोरी*
1 min
416
आज संसार झाला पस्तिशीचा
सुखदुःखाचा डोंगर पार केला
कर्तव्याच्या दोरीने बांधले होते
कुटुंबाचा सांभाळ उत्तम केला...
सुखाच्या सरींनो या ग या
आता तरी माझ्याही परसात
आनंदाची होवू दे या वयात
अंगणात मग छान बरसात....
सुख साठू दे मम ह्रदयी
भरु दे हर्षाच्या खूप खाणी
स्मरण कर्तव्याचे होताच
वाहील हो नयनी पाणी.....,
सुखाच्या सरींनो या ग या
बरसा ग बरसा माझ्या दारी
आनंदाचे घट भरू दे मलाही
माझ्या अन कुटुंबाच्या अंतरी.....
दुःखामागून सुखाची सर
घेवून जीवनी येवू दे
खोलवर मनात त्याची
रूजवण छान होवू दे........
