STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

3  

Rohit Khamkar

Others

कर्तव्य

कर्तव्य

1 min
193

दर्यासारखी मन दुखावली, भेदरली सावज काळोख.

कधी येईल भरत, सुखांच्या सरीची ओंजळ.


बाप फिरला उपाशी, घरटे भरवण्या पोट.

जड झाला म्हातारपनी, तेव्हा दिसते ही खोट.


आई म्हनजे विश्व, झाले लहान हे जग.

झाला एवढा मोठाकी, अभिमानी झाला पग.


भावंडे ती खेळायाची, जिव त्यांच्यावर फार.

वाटण्या नाती वाटून गेली, असा कुटुंबाचा सार.


माझी बायको माझी मुले, यांच्या पुढे काही नाही.

वेळ हीच येईल परत, सुटका तुला सुध्दा नाही.


बदल बदलून गेला, झाला बत्याघोळ जीवनाचा.

ज्यांनी जन्म दिला देहा, विरोध करतो दूर लोटन्याचा.


संस्कृती विसरली झालो वेगळे, आस लागली प्रगतीची.

विसर पडला सगळा, जान नाही कर्तव्याची.


Rate this content
Log in