STORYMIRROR

Manisha Potdar

Others

3  

Manisha Potdar

Others

कर्तव्य मैत्रीचे

कर्तव्य मैत्रीचे

1 min
372

सुख दुःखाला जावे यावे

मैत्रीचे अश्रू हाती घ्यावे

सांत्वन करून हृदय जपावे


द्वेष,मत्सराला जागा नसावी

मैत्रीत प्रगतीला साथ असावी

सत्भावणा फुलत,बहरत यावी


वादविवाद असोत कितीही

संकटाला धावत येते तरीही

लांब असून हृदयात असे काही


बालपणाची मैत्री कट्टी बट्टी

होत असे भांडण रोज हट्टी

पण लगेच होत असे गट्टी


मैत्रीत असावे सारे खरे

जसे जमिनीत पाणी जिरे

मग खडकातून पाझरे झरे


मैत्री निसर्गाची आपली खरी

सारे मिळते आपल्याला घरी

मैत्रीचं नातं जमीन अन् शेतकरी


Rate this content
Log in