कृतज्ञतेचा एक दिवा
कृतज्ञतेचा एक दिवा
1 min
11.3K
सद्गुरुंच्या शिकवणीचा
लावू एक दिवा
त्याला भक्ती सेवेने
उजळायला हवा
आई-बाबांच्या संस्काराचा
लावू एक दिवा
त्याला जिव्हाळ्याने
जपायला हवा
सैनिक-शेतकऱ्यांच्या
त्यागासाठी लावू एक दिवा
त्याला सन्मानाने
जपायलाच हवा
डॉ.,पोलिसांच्या सेवेचा
लावू एक दिवा
त्याला आदराने
जपायला हवा
आपल्या राष्ट्राचा
लावू एक दिवा
प्रगतीच्या ज्योतीने
सतत उंचा वर न्यायला हवा
तुझ्या माझ्या प्रेमाचा
लावू एक दिवा
त्याला आपुलकीच्या तेलाने
तेवत ठेवायला हवा
