करोना
करोना
1 min
637
उघडले डोळे साऱ्यांचे
जीवघेण्या करोनाने
माणूस म्हणून माणसाकडे
आज पाहिले माणसाने
गावी वाट पाहत होते आईबाप
यावे कधीतरी घरी लेकाने
मायलेकरांची नव्हती वर्षानुवर्षे गाठ
ती भेट घडवली करोनाने
शहरातील आईबाप
व्यस्त होते कामाने
लेकरांसाठी वेळ मिळाला
वर्क फ्रॉम होम च्या आदेशाने
कुटुंब एकत्र पुन्हा आलयं
करोनाच्या भीतीने
आज श्वास मोकळा घेतलाय
घुसमटलेल्या नात्याने
