STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Others

4  

Shobha Sanjay Bavdhankar

Others

॥ करोना केअर ॥

॥ करोना केअर ॥

1 min
136

आपल्या घरीच बसा, मारा गप्पाटप्पा  

शेजार्‍यांच्या दारावर चुकूनही थाप मारू नका बाप्पा  


लहानथोरांबरोबर गाण्यांच्या भेंड्या लावा  

जुन्यानव्या गाण्यांचा संगम साधा, आपोआप वाजेल पावा 


मस्त होईल जुगलबंदी, नव्याने गवसेल सुर 

प्रेमाच्या नात्याला गाणी गात येइल पुर 


मग खेळा पत्ते, कॅरम

मांडा सापशिडीचा पट  

रडीचा डाव चिडी

छोटे करतिल गडबड  


मग आजी आजोबा काढतिल समजुत  

नात्यांमधे प्रेमभावाची होइल एकजुट  


होम मिनिस्टरला करा फर्माईश 

शिरा, उप्पीट, थालिपिठ 

होममेड पिज्झा मस्त

ज्वारी बाजरी भाकरी 

त्यावर कांदा मिरची तेलाची धार टाकली 

किचनमधुन हॉलमधे क्षणात होम डिलीव्हरी 

पिज्झा पार्टी झाली घरच्याघरी  


तव्यावरती मस्त खरपुस शेंगदाणे 

आजीने वळले मस्त राजगिरा लाडू 

करोनाचा वाढता प्रभाव, घरीच बसून हाणून पाडू ॥


Rate this content
Log in