क्रिकेटमय देश
क्रिकेटमय देश
मी एक चाहता देश क्रिकेटचा,
क्रिकेट हेच माझे तन मन धन अन् पंचप्राण,
सीझनमध्ये जळी, स्थळी, काष्टी,पाषाणी फक्त क्रिकेटच क्रिकेट,
आणी मेन इन ब्लू ची लहर सगळीकडे,
राष्ट्र जिंकावे म्हणून मी करतो उपास तापास ,
घालतो देवाला साकडे ,
क्रिकेट प्रेमापाई अंधश्रद्धेला देखील पडतो मी बळी
एरवी गावागावात अन् गल्ली गल्लीतील रस्ते
बनतात पीच...
बॅटच्या आकाराचे लाकूड अन् चींधीचाही बाॅल असतो पुरे ...
नियमही असतात तेच आंतरराष्ट्रीय फक्त जागा पाहून ठरलेले...
सीमारेषेचे बंधन रस्त्याच्या अलीकडे अन् पलीकडे...
रंगात आलेला खेळ बघण्यासाठी येणारे जाणारे बनतात मग प्रेक्षक...
खुन्नस, ईर्षा, एकी- बेकी बघत चालता बोलता समालोचनही करतात तज्ञांसारखे...
आजूबाजू राहणारे बनतात स्पाॅन्सरस॔ ...
चाॅकलेटपासून आइस्क्रीम पर्यंत जे काही असेल त्यावर ताव मारतात,
मिळून मीसळून हरलेले आणी जिंकलेले ...
मिळून मीसळून हरलेले आणी जिंकलेले ...
