कृधा
कृधा
1 min
746
राधेसारखी मी कायम तुझीच राहेनही
पण म्हणून तू कृष्ण आणि मी राधा असूच असं नाही
धारेविरुद्ध वाहून राधा होईल ही प्रवाही
पण म्हणून दोन तिरांचं अंतर कृष्णही नाही
अन राधाही
मी श्यामसूर आळवेनही कृष्ण होऊन
पण म्हणून प्रत्येक सूर कृष्ण आणि प्रत्येक ओठ राधा असेलच असं नाही
लोकं बोलतात मी अनयची बायको मग तुझी प्रेयसी
पण ह्या वेळेस तू रुक्मिणीचा नवरा आणि मग माझा प्रियकर असही असेल काही.... #नवयुगाची
#नविकहाणी
#तोराधे
#तीकृष्णा
#कानाही??
