"क्रांतीज्योती सावित्रीबाई "
"क्रांतीज्योती सावित्रीबाई "
1 min
73
नाव सावित्रीबाई जोतीराव फुले
शिकविल्या मुली शिकविली मुले
शिक्षणाचे द्वार मुलींसाठी केले खुले
ज्ञान दानाचे पवित्र कार्य केले//१//
ज्ञानज्योती पेटविल्या मना मनात
तेवत आहे आजही ज्ञानाची वात
वाट बिकट होती शिकण्याची
सुरुवात केली त्यांनी ज्ञानदानाची//२//
घडविली शैक्षणिक क्रांती त्यांनी
अशा सावित्रीबाई फुले बहुगुणी
सोसल्या, त्यांनी यातना अनेक
होते साठलेले मनात विचार नेक //३//
