कर पादाक्रांत...
कर पादाक्रांत...
1 min
219
कर पादाक्रांत शिखरे
तुला नाही कुणाची भीती
तुझाच सारा आसमंत अन
तुझीच सारी धरती!
बीजारोपण तुझिया हातून
सृष्टीची खरी तू जननी,
तुझे सौरतेज गहन असे
न अबला, परी तू मर्दानी
गुलाब तू नाजुक म्हणूनी
खुडले कुणी विभत्स जरी
काट्याचे वरदान फुलाला
रोषीत होऊन डंख करी!
सार्वभौम राज्ञी प्रेमाची तू
तुझ्या उरात वात्सल्यछाया
कठीण नाही चढण कुठली
तुझ्या कुशीत आभाळमाया!
