कफन
कफन
1 min
246
कफनाचा कापड पांढराचं का?
रंगीबेरंगी का नाही हो, बाबा ?
चिरंजीवाने प्रश्न केला,
एक दिवस
त्याचं काय बाळा,
इतर सर्व रंग वाटून घेतलेत
माणसांनी 'प्रतीकं' म्हणून
परंतु, सगळ्या रंगांना
पांढऱ्यातूनच जावं लागतं
कारण स्वच्छतेची,
निर्मळतेची, पावित्र्याची
शुभ्रता असते
पांढऱ्या रंगात
चारित्र्याचं - समर्पणाचं
प्रतीक असतो
पांढरा रंग
