कपाट
कपाट
सगळ्या वस्तू तू सांभाळल्या, तुला सांभाळायचं राहून गेलं.
आज या अश्या परिस्थितीत एकच प्रश्न, तुझ्यासठी नेमक काय केलं.
आलास तेव्हा कवतुक झालं, मिरवले तुला डोक्यावर.
आता वेळेसोबत जुना झालास, नवी खरेदी उरावर.
तुझ्यासाठी आता जागा, घरात आणी मनातही नाही.
नव्या सवंगड्याला मात्र आता, घरात आणायची झाली घाई.
तुझी जागा आता भंगारात, यातही फायदा पाहतोय.
तुझ्या आठवणी ठेव काही, फक्त आता सहवास नकोय.
नव्यालाही तोच मान, कवतुक खूप मिरवू छान.
वेळ त्याच्यावरही येईल, जेव्हा हालत होईल घाण.
शब्दात मांडतो आहे, कारण भीती आहे मलाही.
माझंही शरीर भंगारात जाईल, कदाचित दिसेल तुलाही.
सगळं संपून शेवटी, आयुष्य होईल सपाट.
आत्मा किंवा सामान सांभाळण्या, लागते शरीर किंवा कपाट.
