कोरोनापासून सुरक्षित कसे रहावे
कोरोनापासून सुरक्षित कसे रहावे
1 min
346
शिंका सर्दी ताप खोकला
येताच दवाखान्यात पळा
नकाच तोंडाला हस्तस्पर्श
पथ्यपाणीही थोडे पाळा
टाळू या संपर्क आणि संसर्ग
हस्तांदोलन ही नकाच करू
धुऊ डेटॉलने हातही स्वच्छ
बाहेर जाताना मास्क वापरू
खाऊ ताजे जेवण घरचेच
हॉटेलचे जंकफूडही टाळू
बाहेर जावे लागलेच जरी
गर्दीमध्ये नकाच घोटाळू
जगा नि इतरांनाही जगवा
वापरू स्वच्छतेचा मूलमंत्र
हळदीदूध फलाहार खाणे
कोरोनाला टाळण्याचे तंत्र
कशाने नि कुठूनी चीनमध्ये
पसरली जगात ही आपत्ती
सहकार्याने करू मुकाबला
माणुसकीच आपली संपत्ती
