कोरोनाची शिकवण
कोरोनाची शिकवण


कोरोनामुळे सगळं लॉकडाउन, बंद बंद घरात बसण्याचा जडला छंद
आई बाबा दोघं घरी नवे पदार्थ बनवण्याचे कौशल्य दाखवतात भारी
ताई दादा बसल्या बसल्या खेळतात पत्ते सापशिडी नकळत आजोबांची बंद झाली बिडी
आजीचा तो नजरेचा धाक दरारा काम करण्याचा उत्साह भयानक खरा
सांडते आहे पाणी, फुटते आहे कपबशी नजरेतुन आजोबा चिडवितात तु अशी ग कशी
आजी आजोबांची जमली जोडी नातवंड काढतच आहेत खोडी
सापडला एखादा कोरोना रुग्ण जीव वाचवण्यासाठी सगळे मग्न
लॉकडाउनमुळे लागली शिस्त देवा सगळी तुझ्यावर भिस्त
झाले जरी देउळ बंद घराघरातुन पुजा अर्चना अगरबत्तीचा गंध
देवदर्शनालाही बंद झाला दरबार सगळ्या जगाच्या
कोरोना मुक्तिचा तुझ्या डोक्यावर आहे खरा भार ॥