कोरोना
कोरोना
1 min
263
घाबरवलंय साऱ्या जगाला
एकल्या या रोग कोरोनाने
रोगापेक्षा अफवां पसरवून
केलेय भयभीत वर्तमानाने
शाळा कॉलेज बॅंक मॉल्स
फटक्यात झाली आता बंद
व्यवहार वाहतूक खरेदीही
झालीय सर्वत्र एकदम मंद
शिंका सर्दी ताप खोकला
येताच दवाखान्यात पळा
नका खाऊ बाहेरचे काही
पथ्यपाणीही थोडे पाळा
जागतिक आर्थिक बाजार
झालाय कोरोनामुळे ठप्प
काय झाले अचानक कसेहे
न कळून सरकार झाले गप्प
निघेल लस औषधपाणीही
होऊ नका कुणी असे उदास
पर्याय निघेल या रोगावरही
घ्या निरोगी जीवनाचा श्वास
