STORYMIRROR

Nita Meshram

Others

4  

Nita Meshram

Others

कोरोना

कोरोना

1 min
287

कालपर्यंत जे म्हणत होते

मरायला वेळ नाही

तेच आता जगायचे कसे

हा विचार करीत आहेत

कोरोनासारख्या क्रुर शिक्षकाकडून

जगण्याचे पाठ घेत आहेत

सिलॅबस संपेल परीक्षा होईल

आपण सुधारलो की नाही याची

सावरलो की नाही याची

पास झालो तर बरे

नाहीतर क्रुर शिक्षकाच्या

स्वाधीन होणे आहेच

कारण देव देवळात बंद आहे

माणूस घरात बंद आहे

कोरोनाच्या सावटाखाली

सगळे कसे जेरबंद आहे

माणूस माणसाला दिसत नाही

मृत्युचे तांडव सर्वत्र आहे

जात धर्म पंथ डबाबंद आहेत

कोरोना थैमान घालतो आहे

राक्षसी जबड्यात माणस कोंबतोय

माणसातला देव आता दिसू लागला आहे

माणुसकी पुन्हा जीवंत होऊ लागली आहे

फक्त सच्चा माणूस उरला आहे

कोरोनाचा मुकाबला करीत आहे


Rate this content
Log in