कोरोना
कोरोना
1 min
236
आला आला कोरोना
बाहेर पडू नका आता
घरात बसून कामे करा
नाही मारत हो बाता.....
कोरोनाने धुमाकूळ घातला
हादरवून सोडले सार्या जगाला
घाबरून गेली सगळी जनता
महत्त्व द्या खूपच स्वच्छतेला....
जनतेचे सुख पाहिले
शासनाने विचार करून निर्णय घेतले
घाबरून जावू नका कोणीही
सार्वजनिक कार्यक्रम बंद ठेवले...
शाळा बंद, कार्यक्रम रद्द
सगळेच झाले शांत शांत
कोरोनाने पळता भुई थोडे केले
सगळेच झाले अशांत अशांत....
