STORYMIRROR

Ankit Navghare

Others

3  

Ankit Navghare

Others

कोरोना

कोरोना

1 min
11.7K

जगात सारं आज कोरोनाचा कहर 

मगं मधीमधी उठतो अफवांना लहर


मनामधी साऱ्यांच्या कोरानाचीच धास्ती 

दार बंद, घरातच चाललीया आज मौजमस्ती


कोरोनानी देशाची गत आता अशी झाली 

जनावर बाहेर, माणसांना नजरकैदेची वेळ आली


कोण श्रीमंत, कोण गरीब, तो सोडतो कुणाला 

काय माहित हा रोग नेतो अजुन किती जणाला 


बंद शाळा, बंद दुकान, बंद एसटीची चाकं 

कारण फक्त एक तो कोरोनाचा धाक


थोड्या अंतरावरच पोलीस उभे रोखायला गर्दी 

‌डाक्टरांना नक्की दाखवून द्या कधी खोकला, ताप, सर्दी


कुणी स्थलांतरीत, कुणी मोलमजुर, सर्वांचे खायचेच वांदे 

या लॉकडाऊनमुळे बंद पडले सर्वांचेच छोटेमोठे धंदे


पण इतर देशांमधील लोक पटपट मेली 

लॉकडाऊनमुळे आपली हालत तशी तर नाही झाली          


Rate this content
Log in