कोरोना...!
कोरोना...!
तुला लेका मायना काय लिहायचा विचार क्षणभर मनात आला आणि म्हंटले , तेवढ्या लायकीचा तू नाहीस, तुला माझ्या विचारात सुध्दा जागा देण्याच्या लायकीचा तू नाहीस. तुझं नाव देखील मी घेऊ इच्छित नाही.
बेट्या तुझ्या अंगात इतकी मस्ती की माझ्या बांधवांना गिळंकृत केलेस, आता सांग मी तुला जिवंत ठेवीन काय. तुला बेट्या दहा तोंडे असोत किंव्हा जरासंधासारखा वर असो, तुला आम्ही सम्पविल्याशिवाय रहात नाही. गाठ भरतीयांसी आहे. आता मुकाट्याने प्राण सोडायचा आणि
यमसदनी जायचं. एकट्यालाही त्रासायच नाही. आत्ताच सर्वांभोवती चिरंजीवीत्वाच वलय रेखलय. थोडा जरी प्रयत्न केलास तरी जळून खाक होशील.
मराठीत सांगितलेलं समजत नाही काय? इंग्लिश मध्ये सांगू. go CORONA go go go...!
भ्यालं ते, काळजी करू नका माझ्या बांधवांनो. दीर्घ श्वास घ्या, प्राणायाम करा, प्रतिकार शक्ती वाढवा,चांगला आहार घ्या, अलिप्त रहा, वैयक्तिक साधना चांगली करा, सदृढ रहा, निरोगी रहा आणि या बेट्याला समूळ मारून नष्ट करा...!
झांगट नाद केलाय शंख ध्वनी पण केलाय आता काय बिशाद आहे त्याची त्रासण्याची...?
आला मंतर कोला मंतर च्छू च्छू च्छू....!
गेला लेकाचा..!
