कोरोना
कोरोना
जा रे बाबा जा
आता जास्त अंत
पाहू नको।
किती जीव घेणार आहेस।
लहान लेकरांना देखील किती दिवस घाबरवणार आहे
साधी सर्दी खोकला झाला तरी लहान पोर घाबरायला लागली
कोरोनाची भीती मनात घर करायला लागली।
उठसुट त्याच गप्पा त्याच बातम्या
आणि तेच वातावरण
उगीच घसा खवखवायला लागतो
वाटते झाले अंग गरम।
सानिटायझर वापरून वापरून
सालटे लागले निघू।
काढे पिऊन पिऊन पोटात
लागली आग पडू।
तुझ्यामुळे गरीब श्रीमंत काही
राहील नाही
एकाच मास्कने तोंड दाबल बोलायलाच ठेवलं नाही काही।
नातेवाईक तू दूर सारले
भेटत नाही कोणी कोणाला
घरातच बसून विचारतो
खुशाली एकमेकांना।
आता बस कर आता सगळे तुला
वैतागले।
निघून जा आता पहिल्यासारखे
हसते खेळते दिवस येऊ दे चांगले
