कोरोना
कोरोना
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
देवा, कुठे लपलास तू
जरा पहा पृथ्वीकडे ;
"कोरोना" नामक यमदूताने
हाहाकार माजला चोहीकडे .
बसक्या नाकाच्या चिनींनी
केलाय हा जीवघेणा जादूटोणा ;
" सॅनिटाईझर लावा, हात धुवा"
कारण आलाय कोरोना .
सोशल डिस्टनसिंग पाळा
व्हा एकमेकांपासून वेगळे ;
"घरी रहा , सुरक्षित रहा "
पथ्य हे किती आगळे ?
कोरोनाचा विळखा पडता
कोणी जवळ फिरकत नाही ;
प्रेताच्या कफनावर कुणाचे
दोन अश्रू सांडत नाही.
कोरोना महामारीने प्रकोपाने
रोज भीतीने काहूर उठे ;
कोरोनाग्रस्तांचा आकडा पाहता
सकलांचा कंठ दाटे .
रक्षक बनून फिरताहेत
डॉक्टर, नर्स, शिक्षक, पोलीस ;
अजून किती काळ कोरोना
धरेल सृष्टीस ओलिस ?