कोरोना
कोरोना
आला आला बाप
वायरसचा ताप..
चीन प्याला सूप
वटवाघळाचं खूप...
चिकटून त्याला
कोरोनाही आला..
विदेशातून फिरायला
भारतातही हा आला...
लक्षणे दाखवायला
उशीर त्याने केला..
कोवीड19 हसला
बसकन मारून बसला...
लोकही ऐकेनात
गांभीर्य जाणेनात..
लोळत अज्ञानात
कोठेही थांबेनात...
लाॅकडाऊन करूनही
फटके खाऊनही..
कुठेही कोणाचेही
भरले पोट नाही...
21दिन ठेवा संयम
संचारबंदी कायम..
भल्याचा हा नियम
नाहीतर गाठेल हो यम...
कोरोना फैलावतोय
झपाट्याने पसरतोय..
अंतर जो ठेवतोय
मनुष्य तोच वाचतोय...
ताप ,खोकला सुका
श्वसन त्रास आणि शिंका..
हवी असेल सुटका
तर दुर्लक्ष करू नका...
वेळीच रहा बंदिस्त
स्वतःलाच लावा शिस्त..
उपचार घेऊन रास्त
राेग पसरवू नका जास्त...
ठेवून आत्मभान
मिळवू सारे मान..
कोरोनाला हाकलून
दाखवू भारत महान...
लोप पावेल मानवजात
धरू नका गृहित..
साबणाने धुवून हात
राखू चला जनहित